ध्वनी
स्वाध्याय
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
1. ध्वनीचे प्रसारण __________ मधून होत नाही.
उत्तर: निर्वात (हवा नसलेल्या जागेत).
2. ध्वनी प्रदूषण ही एक __________ समस्या आहे.
उत्तर: सामाजिक.
3. कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला __________ म्हणतात.
उत्तर: गोंगाट.
4. गोंगाटाचा __________ वर वाईट परिणाम होतो.
उत्तर: आरोग्य.
2. काय करावे बरे? (योग्य कृती लिहा)
1. मोटारसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल, तर __________.
उत्तर: तो दुरुस्त करून घ्यावा.
2. परिसरातील कारखान्याचा मोठा आवाज त्रास देत असेल, तर __________.
उत्तर: प्रशासनाकडे तक्रार करावी.
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
प्रश्न 1 : कंपन म्हणजे काय?
उत्तर: वस्तू जेव्हा सतत पुढे-पाठोपाठ हलते, त्याला कंपन म्हणतात आणि त्यामुळे ध्वनी निर्माण होतो.
प्रश्न 2 : ध्वनीचे प्रसारण घन पदार्थांतून कसे होते? व्यवहारातील उदाहरणे द्या.
उत्तर: घन पदार्थांमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. उदाहरणार्थ, टेबलावर कान ठेवून टिचकी मारल्यास तो आवाज स्पष्ट ऐकू येतो.
प्रश्न 3 : ध्वनी प्रदूषण म्हणजे काय?
उत्तर: अनावश्यक आणि त्रासदायक आवाजामुळे होणारा गोंगाट म्हणजे ध्वनी प्रदूषण होय.
प्रश्न 4 : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल?
उत्तर: गाड्यांचे हॉर्न कमी करणे, टीव्ही व स्पीकरचा आवाज कमी ठेवणे आणि कारखाने वसतीपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
४. तक्ता पूर्ण करा.
ध्वनीचे स्वरूप | त्रासदायक असणारे | त्रासदायक नसणारे |
---|---|---|
बोलणे | ❌ | ✅ |
कुजबुजणे | ❌ | ✅ |
विमानाचा आवाज | ✅ | ❌ |
गाड्यांचे हॉर्न | ✅ | ❌ |
रेल्वे इंजिन | ✅ | ❌ |
पाण्याची सळसळ | ❌ | ✅ |
घोड्याचे खिंकाळणे | ❌ | ✅ |
घड्याळाची टिकटिक | ❌ | ✅ |
Leave a Reply