कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय
१. कंसातील दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा.
अ. विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे.त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल. कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे.
आ. घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल.म्हणजेच स्थितिज ऊर्जेचे रूपांतरण गतिज ऊर्जेत होईल.
इ. दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल. रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण प्रकाश ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय.
ई. सौर चूल हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे, तर सौर विद्युतघट व सौर दिवे हे सूर्याच्या प्रकाश ऊर्जेचे उपयोजन आहे.
उ. एका मजुराने चार पाट्या खडी १०० मीटर अंतरावर वाहून नेली.जर त्याने दोन पाट्या खडी २०० मीटर अंतरावर वाहून नेली, तर अधिक कार्य घडेल.
ऊ. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय.
२. सांगा मी कोणाशी जोडी करू ?
अ गट | ब गट |
---|---|
१. घरंगळणारा पदार्थ | गतिज ऊर्जा (इ) |
२. अन्न | रासायनिक ऊर्जा (उ) |
३. ताणलेले धनुष्य | स्थितिज ऊर्जा (ई) |
४. सूर्यप्रकाश | उष्णता ऊर्जा (अ) |
५. युरेनिअम | अणू ऊर्जा (आ) |
३. काय सांगाल ?
अ. विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल?
- एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, तर त्यास विस्थापन म्हणतात.
आ. कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल?
- कार्य मोजण्यासाठी बल आणि विस्थापन यांचा विचार करावा लागतो.
इ. ऊर्जेची विविध रूपे कोणती?
- स्थितिज ऊर्जा, गतिज ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा इत्यादी.
ई. निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा.
- सूर्याची उष्णता → समुद्राचे पाणी वाफेचे ढग बनते → पाऊस पडतो → नद्यांमधून पाणी धरणात साठते → धरणाचे पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले जाते.
उ. ऊर्जाबचत का करावी?
- ऊर्जा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने तिचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
- विजेचा अपव्यय टाळणे, सौर ऊर्जा वापरणे यामुळे ऊर्जा बचत करता येते.
ऊ. हरित ऊर्जा कशाला म्हणतात?
- ज्या ऊर्जेच्या स्त्रोतांमुळे प्रदूषण होत नाही, त्यांना हरित ऊर्जा म्हणतात. उदा. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा.
ए. अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात?
- जे ऊर्जा स्रोत सतत मिळतात आणि संपत नाहीत, त्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात. उदा. सौर ऊर्जा, वारा, समुद्राच्या लाटा, अणूऊर्जा.
ऐ. सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो?
- सौर ऊर्जा उपकरणांमध्ये प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा चा वापर केला जातो.
ओ. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे?
- कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारखे ऊर्जा स्रोत मर्यादित प्रमाणात आहेत आणि लवकर संपतात.
- अपारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणमुक्त आणि न संपणारे आहेत, त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
४. आमच्यात वेगळा कोण?
१. डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा (हे नवीकरणीय स्रोत आहे.)
२. धावणारी मोटार, ओंडका वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक (हे गतिशील नाही.)
३. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल (हे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे.)
४. बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात ए.सी. चालू करणे, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे (हे ऊर्जा बचत करणारे आहे.)
५. खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा.
ऊर्जेचे प्रकार:
- उष्णता ऊर्जा (म ग उ ष्ण ता)
- स्थितिज ऊर्जा (स्थि ति ज)
- जल ऊर्जा (ज ल)
- पवन ऊर्जा (प व न)
- रासायनिक ऊर्जा (रा सा य नि क)
- विद्युत ऊर्जा (वि द्यु त)
Leave a Reply