बल व बलाचे प्रकार
स्वाध्याय
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा:
(अ) वस्तूची गती बदलण्यासाठी बल लावावे लागते.
(आ) हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर स्नायू बल, यांत्रिक बल व घर्षण बल ही बले लावलेली असतात.
(इ) एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला. त्याची दिशा बदलायची असेल, तर त्यावर बल लावावे लागेल.
(उ) घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते.
२. शोधा पाहू, माझा सोबती कोण ?
बैलाने गाडी ओढणे. (इ) स्नायू बल
क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे. (अ) यांत्रिक बल
ताणकाट्याने वजन करणे. (ई) गुरुत्वीय बल
सायकलला ब्रेक लावणे. (उ) घर्षण बल
घासलेल्या प्लॅस्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे. (आ) स्थितिक विद्युत बल
३. खालील उदाहरणांमध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत ती ओळखा.
(अ) उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू – गुरुत्वीय बल
(आ) आकाशातून जाणारे विमान – यांत्रिक बल, गुरुत्वीय बल
(इ) उसाच्या चरकातून रस काढताना – स्नायू बल, घर्षण बल
(ई) धान्य पाखडले जात असताना – गुरुत्वीय बल, घर्षण बल
४. प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्नायू बल: ओझे उचलताना आपण स्नायूंचा उपयोग करतो.
गुरुत्वीय बल: झाडावरील फळ गळून खाली पडते.
यांत्रिक बल: मिक्सर ग्राइंडर वापरून मसाला दळला जातो.
स्थितिक विद्युत बल: केसांवर घासलेला कंगवा कागदाचे कपटे उचलतो.
घर्षण बल: सायकल चालवताना ब्रेक लावल्यास सायकल थांबते.
चुंबकीय बल: चुंबक लोखंडी वस्तूंना आकर्षित करतो.
५. असे का?
(अ) यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते.→ कारण घर्षण कमी होऊन यंत्रे सुरळीत चालतात.
(आ) वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते.→ कारण पृथ्वीवरील गुरुत्वीय बल वस्तूंना खाली ओढते.
(इ) कॅरम बोर्डवर पावडर टाकतात.→ कारण पृष्ठभाग गुळगुळीत होऊन घर्षण कमी होते.
(ई) रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो.→ कारण घर्षण वाढून लोकांना चालताना पाय घसरू नयेत.
6. आमच्यातील वेगळेपणा काय ?
(अ) स्नायू बल व यांत्रिक बल
- स्नायू बल – शरीरातील स्नायूंच्या मदतीने लावलेले बल.
- यांत्रिक बल – यंत्राच्या मदतीने लावलेले बल.
(आ) घर्षण बल व गुरुत्वीय बल
- घर्षण बल – वस्तूंच्या गतीच्या विरोधात कार्य करणारे बल.
- गुरुत्वीय बल – पृथ्वीने वस्तूंना आपल्याकडे खेचण्यासाठी लावलेले बल.
७. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) बल लावून काय काय करता येते?→ वस्तू हलवता येतात, थांबवता येतात, त्यांच्या गतीत किंवा दिशेत बदल करता येतो.
(आ) वजन म्हणजे काय?→ वस्तूवर पृथ्वीने लावलेले गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन.
(इ) स्नायू बलाने चालणारी यंत्रे कोणती?→ सायकल, रिक्षा, हाताने चालवली जाणारी पाणी पंप.
८. खालील शब्दकोडे सोडवा.
(उभे शब्द)
1. बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी स्नायू बल लावावे लागते.
2. सांडलेल्या पिना उचलण्यासाठी चुंबकीय बलाचा उपयोग करता येतो.
(आडवे शब्द)
3. चुंबक लोखंडी खिळ्याला स्वतःकडे ओढतो.
4. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांगरले तेव्हा यांत्रिक बल लावले गेले.
5. ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर गुरुत्वीय बलामुळे पडतात.
Leave a Reply