आपत्ती व्यवस्थापन
लहान प्रश्न
1. आपत्ती म्हणजे काय?
→ अचानक होणाऱ्या संकटामुळे जीवित व वित्तहानी होते, त्याला आपत्ती म्हणतात.
2. आपत्ती किती प्रकारच्या असतात?
→ आपत्ती दोन प्रकारच्या असतात – नैसर्गिक आणि मानवनिर्मित.
3. महापुराचे मुख्य कारण काय असते?
→ अतिवृष्टीमुळे नदीला पूर येतो आणि परिसरात पाणी साचते.
4. भूकंप का होतो?
→ भूगर्भातील हालचालींमुळे पृथ्वी हलते आणि भूकंप होतो.
5. वादळामुळे काय नुकसान होते?
→ वीजपुरवठा बंद होतो, झाडे पडतात, घरांचे नुकसान होते.
6. सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार काय करावा?
→ जखम स्वच्छ धुवावी, घट्ट कपडा बांधावा आणि त्वरित डॉक्टरांकडे जावे.
7. महापुरानंतर कोणते आजार होऊ शकतात?
→ डायरिया, त्वचारोग आणि डेंग्यू सारखे आजार होऊ शकतात.
8. वणवा म्हणजे काय?
→ जंगलात अचानक लागलेली मोठी आग म्हणजे वणवा.
9. प्रथमोपचार का महत्त्वाचे असतात?→ जखमी व्यक्तीला त्वरित मदत मिळावी म्हणून.
10. उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?
→ सावलीत राहावे, पाणी प्यावे, हलके कपडे घालावे.
11. किल्लारी भूकंप कोणत्या वर्षी झाला?
→ १९९३ साली किल्लारी भूकंप झाला.
12. आपत्तीच्या वेळी मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर कॉल करावा?
→ पोलीस – 100, अग्निशमन – 101, रुग्णवाहिका – 102, आपत्ती नियंत्रण – 108.
लांब प्रश्न
1. आपत्तीच्या वेळी मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर कॉल करावा?
→ पोलीस – 100, अग्निशमन – 101, रुग्णवाहिका – 102, आपत्ती नियंत्रण – 108.
2. महापुराचे परिणाम काय असतात?
→ महापुरामुळे शेतीचे नुकसान, जमिनीची धूप, घरांची पडझड आणि आरोग्यास धोका होतो.
3. भूकंप झाल्यास काय काळजी घ्यावी?
→ भूकंपाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी जावे, टेबलखाली लपावे आणि इमारतींपासून दूर रहावे.
4. वादळाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी?
→ वादळाच्या वेळी घरात सुरक्षित रहावे, झाडांपासून दूर रहावे आणि आवश्यक वस्तू जवळ ठेवाव्यात.
5. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय?
→ आपत्तीपूर्वी आणि आपत्तीच्या वेळी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आखलेली उपाययोजना म्हणजे आपत्ती व्यवस्थापन.
6. उष्माघात झाल्यास काय करावे?
→ उष्माघात झाल्यास रुग्ण सावलीत ठेवावा, थंड पाण्याने पुसावे आणि भरपूर पाणी द्यावे.
7. सर्पमित्र कोण असतात आणि त्यांचे काम काय असते?
→ सर्पमित्र सापांना मारत नाहीत, त्यांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडतात.
Leave a Reply