विश्वाचे अंतरंग
लहान प्रश्न
1. आपली आकाशगंगा कोणत्या नावाने ओळखली जाते?
- मंदाकिनी किंवा आकाशगंगा.
2. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत?
- आठ ग्रह आहेत.
3. सूर्याचा रंग कोणता आहे?
- पिवळसर रंगाचा.
4. बुध ग्रहावर मोठे खड्डे का आहेत?
- उल्कापातामुळे खड्डे निर्माण होतात.
5. सर्वांत मोठा ग्रह कोणता आहे?
- गुरू ग्रह.
6. सर्वांत चमकदार ग्रह कोणता आहे?
- शुक्र ग्रह.
7. घरंगळत फिरणारा ग्रह कोणता आहे?
- युरेनस ग्रह.
8. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे?
- बुध ग्रह.
9. सूर्याचे तापमान किती असते?
- सुमारे ६०००°C.
10. मंगळ ग्रहाचा रंग लालसर का?
- मंगळाच्या मातीत लोह असते.
11. ग्रह स्वतः प्रकाश का देत नाहीत?
- ते सूर्याच्या प्रकाशाने चमकतात.
12. ध्रुवताऱ्याचे विशेष गुणधर्म कोणते आहेत?
- तो कायम उत्तर दिशेला दिसतो.
13. शनी ग्रहाभोवती काय आहे?
- कड्या आहेत.
14. चंद्र पृथ्वीभोवती किती दिवसात फिरतो?
- २७.३ दिवसांत.
15. आपल्या शेजारील आकाशगंगेचे नाव काय?
- देवयानी.
16. धूमकेतू सूर्याजवळ आल्यावर चमकतो का?
- सूर्याच्या उष्णतेमुळे शेपटी तयार होते.
17. सर्वांत उंच पर्वत कोणत्या ग्रहावर आहे?
- मंगळ ग्रहावर, ऑलिम्पस मॉन्स.
18. गुरू ग्रहाला दुसरे नाव काय आहे?
- वादळी ग्रह.
19. शुक्र ग्रह कोणत्या दिशेने फिरतो?
- पूर्वेकडून पश्चिमेकडे.
20. उल्का आणि अशनी यात काय फरक आहे?
- उल्का जळते, अशनी पृथ्वीवर पडते.
लांब प्रश्न
1. दीर्घिका म्हणजे काय? त्याचे प्रकार सांगा.
- ताऱ्यांचा, ग्रहांचा आणि वायूंचा मोठा समूह म्हणजे दीर्घिका. ती सर्पिल, लंबवर्तुळ आणि अनियमित प्रकारांची असते.
2. सूर्यमालेतील ग्रह कोणते? त्यांचे गट सांगा.
- बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्गत ग्रह आहेत, तर गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे बाह्य ग्रह आहेत.
3. सूर्याचे गुरुत्वाकर्षण महत्त्वाचे का?
- सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह त्यांच्या कक्षेत स्थिर राहतात आणि सूर्यमाला एकत्र राहते.
4. मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय आहे?
- मंगळ लालसर दिसतो कारण त्याच्या मातीत लोह आहे, आणि त्यावर ऑलिम्पस मॉन्स नावाचा उंच पर्वत आहे.
5. शनी ग्रहाचे वैशिष्ट्य काय आहे?
- शनीभोवती सुंदर कड्या आहेत, आणि त्याची घनता एवढी कमी आहे की तो पाण्यात तरंगू शकतो.
6. उल्का आणि अशनी यात काय फरक आहे?
- उल्का पृथ्वीच्या वातावरणात जळून जाते, पण अशनी पूर्ण न जळता जमिनीवर पडते.
7. धूमकेतू म्हणजे काय? तो सूर्याजवळ चमकतो का?
- धूमकेतू बर्फ आणि धूळ यांचे बनलेले असतात; सूर्याजवळ आल्यावर त्यांच्या शेपट्या चमकतात.
8. पृथ्वीवर जीवसृष्टी का आहे?
- पृथ्वीवर योग्य तापमान, पाणी, हवा आणि ओझोनमुळे जीवसृष्टी टिकून आहे.
Leave a Reply