प्रकाश व छायानिर्मिती
लहान प्रश्न
प्रश्न 1 : प्रकाश म्हणजे काय?
उत्तर: प्रकाश ही एक प्रकारची ऊर्जा आहे जी आपल्याला वस्तू पाहण्यासाठी मदत करते.
प्रश्न 2 : प्रकाश किती प्रकारचे असतात?
उत्तर: दोन प्रकारचे – नैसर्गिक (सूर्य, तारे) आणि कृत्रिम (बल्ब, ट्यूबलाईट).
प्रश्न 3 : प्रकाश कोणत्या दिशेत प्रवास करतो?
उत्तर: प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो.
प्रश्न 4 : प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत?
उत्तर: सूर्य, तारे, काजवे आणि अँगलरफिश.
प्रश्न 5 : प्रकाशाचे कृत्रिम स्रोत कोणते आहेत?
उत्तर: बल्ब, ट्यूबलाईट, मेणबत्ती, विजेरी.
प्रश्न 6 : प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय?
उत्तर: प्रकाश वस्तूवर पडून पुन्हा परत जाण्याच्या प्रक्रियेला परावर्तन म्हणतात.
प्रश्न 7 : कोणत्या वस्तूंमध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसते?
उत्तर: आरसा, स्वच्छ पाणी, नवीन स्टील प्लेट.
प्रश्न 8 : आपल्याला वस्तू का दिसतात?
उत्तर: कारण प्रकाश वस्तूवर पडतो आणि त्याचे परावर्तन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचते.
प्रश्न 9 : सूर्य स्वतः प्रकाश निर्माण करतो का?
उत्तर: होय, सूर्य स्वतः प्रकाश निर्माण करतो.
प्रश्न 10 : चंद्र आपल्याला का दिसतो?
उत्तर: कारण तो सूर्यप्रकाश परावर्तित करतो.
प्रश्न 11 : सूर्यप्रकाश किती रंगांचा असतो?
उत्तर: सात रंगांचा – तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा.
प्रश्न 12 : छाया कशामुळे तयार होते?
उत्तर: जेव्हा प्रकाशाच्या मार्गात अपारदर्शक वस्तू येते, तेव्हा छाया तयार होते.
प्रश्न 13 : सकाळ-संध्याकाळ छाया मोठी का असते?
उत्तर: कारण सूर्याचा कोन कमी असतो.
प्रश्न 14 : सूर्यतबकडी म्हणजे काय?
उत्तर: छायेच्या मदतीने वेळ मोजण्याचे उपकरण.
प्रश्न 15 : सपाट आरशात दिसणाऱ्या प्रतिमेचे वैशिष्ट्य काय?
उत्तर: ती वस्तूपेक्षा तितक्याच आकाराची आणि डावे-उजवे बदललेली असते.
लांब प्रश्न
प्रश्न 1 : प्रकाशाचे नैसर्गिक आणि कृत्रिम स्रोत कोणते?
उत्तर: सूर्य, तारे हे नैसर्गिक स्रोत आहेत, तर बल्ब, मेणबत्ती आणि विजेरी हे कृत्रिम स्रोत आहेत, जे अंधारात प्रकाश देतात.
प्रश्न 2 : प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय?
उत्तर: प्रकाश एखाद्या वस्तूवर आदळून परत जातो, त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात, त्यामुळेच आपण वस्तू पाहू शकतो.
प्रश्न 3 : छाया तयार होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात?
उत्तर: प्रकाश स्रोत, अपारदर्शक वस्तू आणि छाया पडण्यासाठी पडदा आवश्यक असतो, कारण प्रकाश अपारदर्शक वस्तूमधून जाऊ शकत नाही.
प्रश्न 4 : सपाट आरशातील प्रतिबिंबाची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर: आरशातील प्रतिमा वस्तूइतकीच मोठी असते, ती आरशाच्या मागे दिसते आणि तिची डावी-उजवी बाजू बदललेली असते.
प्रश्न 5 : सूर्यप्रकाश कोणकोणत्या रंगांनी बनलेला आहे?
उत्तर: सूर्यप्रकाश सात रंगांचा (VIBGYOR) असतो – तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा.
प्रश्न 6 : पारदर्शक, अर्धपारदर्शक आणि अपारदर्शक वस्तूंचा प्रकाशावर काय परिणाम होतो?
उत्तर: पारदर्शक वस्तू पूर्ण प्रकाश जाऊ देतात, अर्धपारदर्शक थोडा प्रकाश जाऊ देतात, तर अपारदर्शक प्रकाश अडवतात व छाया तयार करतात.
प्रश्न 7 : सूर्यतबकडी कशी काम करते?
उत्तर: सूर्यप्रकाशामुळे पडणाऱ्या छायेच्या हालचालींवरून वेळ मोजली जाते, ही प्राचीन वेळ मोजण्याची पद्धत होती.
प्रश्न 8 : सर आयझॅक न्यूटन यांनी प्रकाशाबद्दल कोणता शोध लावला?
उत्तर: त्यांनी न्यूटन तबकडी तयार करून सिद्ध केले की सूर्यप्रकाश सात रंगांनी बनलेला असतो.
Leave a Reply