स्वाध्याय
1. ओळखा पाहू.
1. सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत?
- आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ, गौतमीपुत्र सातकर्णी.
2. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय होते?
- कुंतल.
2. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा.
राजसत्ता | राजधानी |
---|---|
पल्लव | कांचीपुरम |
चालुक्य | ऐहोळे, बदामी, पट्टदकल |
सातवाहन | प्रतिष्ठान (पैठण) |
3. खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा.
अ. क्र. | राजसत्ता | राजधानी |
---|---|---|
1 | सातवाहन | प्रतिष्ठान (पैठण) |
2 | पांड्य | मदुराई |
3 | चालुक्य | वातापी (बदामी) |
4 | वाकाटक | नंदीवर्धन |
5 | पल्लव | कांचीपुरम |
4. पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हांला काय माहिती मिळते ते लिहा.
1. सातवाहन नाणे:
- सातवाहन काळातील नाण्यांवर जहाजाची प्रतिमा असायची, यावरून तो काळ व्यापारासाठी प्रसिद्ध होता.
2. कार्ले येथील चैत्यगृह:
- हे सातवाहन काळातील बौद्ध स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे, जे कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे.
3. अजिंठा लेणी:
- वाकाटक काळात खोदलेली ही लेणी चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत.
5. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या?
- चेर, पांड्य, चोळ, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट.
2. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले?
- महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले.
6. थोडक्यात उत्तरे लिहा.
1. महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा.
- तो पल्लव घराण्याचा कर्तबगार राजा होता.
- त्याने पल्लव साम्राज्याचा विस्तार केला आणि महाबलीपुरम येथे रथमंदिरे कोरवली.
2. त्रिसमुद्रतोयपीतवाहन म्हणजे काय, ते स्पष्ट करा.
- त्रिसमुद्रतोयपीतवाहन याचा अर्थ “ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्याले आहे”.
- हा गौतमीपुत्र सातकर्णीबद्दलचा उल्लेख आहे, जो अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरापर्यंत राज्य करणारा राजा होता.
3. मुझिरीस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे?
- मसाले, मोती, मौल्यवान रत्ने आणि इतर व्यापारवस्तू रोम आणि पश्चिमेकडील देशांना निर्यात केल्या जात.
Leave a Reply