स्वाध्याय
1. एका वाक्यात उत्तरे द्या:
1. जनपदे म्हणजे काय?
➝ इ.स.पू. 1000 ते इ.स.पू. 600 या काळात अस्तित्वात आलेली छोटी-छोटी राज्ये म्हणजे जनपदे.
2. .महाजनपदे म्हणजे काय?
➝ हळूहळू बलशाली झालेल्या आणि मोठ्या भूभागावर पसरलेल्या जनपदांना महाजनपदे म्हणतात.
3. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली?
➝ राजगृह (राजगीर) येथे अजातशत्रूच्या काळात पहिली बौद्ध परिषद झाली.
4. वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली?
➝ नंद राजांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली.
2. सांगा पाहू:
1. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या कोणत्या जनपदाने व्यापला होता?➝ आजच्या महाराष्ट्राचा काही भाग अश्मक या जनपदाने व्यापला होता.
2. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींच्या गटाला काय म्हणत?➝ जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींच्या गटाला गणपरिषद असे म्हणत.
3. ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला काय म्हणत?➝ ज्या सभागृहात राज्यकारभाराच्या चर्चा होत असत त्याला संथागार म्हणत.
4. गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते?➝ गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते.
5. चतुरंग सैन्य म्हणजे काय?➝ पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ मिळून बनलेले सैन्य म्हणजे चतुरंग सैन्य.
3. जोड्या जुळवा:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) संगिती | (अ) अजातशत्रू |
2) धनानंद | (ड) नंद राजा |
3) पाटलीग्राम | (क) महागोविंद |
4. भारतातील विविध घटकराज्ये व त्यांच्या राजधान्या यांची यादी:
महाजनपदाचे राज्य | ठिकाण | राजधानी | प्रमुख राजा |
---|---|---|---|
कोसल | हिमालयाच्या पायथ्याशी | श्रावस्ती | प्रसेनजित |
वत्स | उत्तर प्रदेश | कौशांबी | उदयन |
अवंती | मध्य प्रदेश (माळवा) | उज्जयिनी | प्रद्योत |
मगध | बिहार, बंगाल | राजगृह (राजगीर) | बिंबिसार, अजातशत्रू |
Leave a Reply