स्वाध्याय
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा:
- जैन धर्मात अहिंसा या तत्त्वाला महत्त्व दिलेले आहे.
- सर्व प्राणिमात्रांविषयीची करुणा हे गौतम बुद्ध यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते.
2. थोडक्यात उत्तरे द्या:
1. वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली?
- वर्धमान महावीरांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पंचमहाव्रतांचे पालन करण्याची शिकवण दिली.
- त्यांनी सांगितले की मानवाचे मोठेपण त्याच्या जन्मावर नाही, तर त्याच्या आचरणावर ठरते.
2. गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे, त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात?
- “छोटीशी चिमणीदेखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते.”
- यातून स्वातंत्र्य, समानता आणि करुणा या मूल्यांना महत्त्व देण्यात आले आहे.
3. ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे?
- न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे आणि स्वाभिमान या गुणांना महत्त्व आहे.
- ज्यू धर्मात देव एक आहे असे मानले जाते.
4. ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे?
- देव एकच आहे आणि तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे.
- आपण सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावे आणि चुकलेल्यांना क्षमा करावी.
5. इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते?
- अल्लाह एकच आहे आणि मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत.
- मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे आहे.
6. पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे?
- “उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती” हे पारशी विचारसरणीचे तीन महत्त्वाचे तत्त्व आहेत.
- पारशी धर्मात अग्नी आणि पाणी यांना पवित्र मानले जाते.
3. टीपा लिहा:
1. आर्यसत्ये:
- मानवी जीवनात दुःख आहे.
- दुःखाला कारण असते.
- दुःख दूर करता येते.
- दुःखाच्या नाशासाठी अष्टांगिक मार्ग आहे.
2. पंचशील:
- प्राण्यांची हत्या करू नये.
- चोरी करू नये.
- अनैतिक आचरण करू नये.
- असत्य बोलू नये.
- मादक पदार्थांचे सेवन करू नये.
4. पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करा:
पंचमहाव्रते | त्रिरत्ने |
---|---|
अहिंसा | सम्यक दर्शन |
सत्य | सम्यक ज्ञान |
अस्तेय | सम्यक चारित्र |
अपरिग्रह | – |
ब्रह्मचर्य | – |
5. कारणे लिहा:
1. वर्धमान महावीरांना ‘जिन’ का म्हणू लागले?
- त्यांनी स्वतःच्या विकारांवर विजय मिळवला, म्हणून त्यांना ‘जिन’ म्हणजे जिंकणारा असे म्हटले.
- ‘जिन’ या शब्दावरून ‘जैन’ धर्म हा शब्द तयार झाला.
2. गौतम बुद्धांना ‘बुद्ध’ असे का म्हटले गेले?
- त्यांनी ज्ञान प्राप्त केले, म्हणून त्यांना ‘बुद्ध’ (प्रबुद्ध) असे नाव मिळाले.
- बुद्धांनी मानवाच्या दुःखांचे कारण शोधून त्यावर उपाय सांगितला.
Leave a Reply