स्वाध्याय
1. एका वाक्यात उत्तरे लिहा:
1. लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई?
➝ खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भूर्जपत्रे आणि ताम्रपट यांचा उपयोग लिहिण्यासाठी केला जात असे.
2. वेदवाड्मयातून कोणती माहिती मिळते?
➝ प्राचीन भारतीय समाजजीवन, धर्म, परंपरा आणि ज्ञान यांची माहिती वेदवाड्मयातून मिळते.
3. मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे?
➝ वैदिक साहित्य, जैन आणि बौद्ध ग्रंथ, लोककथा, ओव्या आणि पोवाडे मौखिक परंपरेने जतन केले आहेत.
2. खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा:
भौतिक साधने | लिखित साधने | मौखिक साधने |
---|---|---|
मातीची भांडी | ताम्रपट | लोककथा |
मणी | शिलालेख | ओवी |
स्तूप | प्रवासवर्णने | पोवाडा |
नाणी | वैदिक साहित्य | भजन |
– | पुराणग्रंथ | – |
4. कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा:
- नाण्यावरील मजकूर: राजा किंवा संस्थेचे नाव, मूल्य.
- वापरलेला धातू: सोने, चांदी, तांबे किंवा कांस्य.
- नाण्यावरील वर्ष: ते कधी तयार करण्यात आले.
- आकार: गोल, चौरस किंवा अन्य प्रकार.
- किंमत: त्या काळातील चलन मूल्य.
5. कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत? त्यांचे गटात सादरीकरण करा:
उदाहरण:
- कविता: बालगीत, धार्मिक श्लोक.
- श्लोक: भगवद्गीतेतील श्लोक.
- प्रार्थना: शाळेतील प्रार्थना.
- पाढे: 2 चा पाढा, 3 चा पाढा इत्यादी.
Leave a Reply