१. शुंग घराणे
- मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहद्रथ होता.
- त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने त्याचा वध करून शुंग घराण्याची स्थापना केली.
- शुंग घराण्याने मौर्य साम्राज्याचा काही भाग सांभाळला.
- पुष्यमित्र शुंगानंतर त्याचा पुत्र अग्निमित्र राजा झाला.
- शुंग घराण्यानंतर कण्व घराणे आले, पण त्यांचे राज्य फार काळ टिकले नाही.
२. इंडो-ग्रीक राजे
- मौर्य साम्राज्यानंतर भारताच्या वायव्य भागात (उत्तर-पश्चिम भागात) ग्रीक राजे राज्य करत होते.
- या राजांना ‘इंडो-ग्रीक’ राजे असे म्हटले जाते.
- मिनँडर (मिलिंद) हा सर्वात प्रसिद्ध इंडो-ग्रीक राजा होता.
- त्याने बौद्ध भिक्खू नागसेन यांच्याशी बौद्ध तत्त्वज्ञानावर चर्चा केली.
- या चर्चेवरून ‘मिलिंदपञ्ह’ नावाचा ग्रंथ तयार झाला.
- इंडो-ग्रीक राजांनी नाण्यांवर एका बाजूला राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र असलेली नाणी तयार केली.
- नाण्यांवर ग्रीक आणि खरोष्ठी लिपीचा वापर केला जात असे.
३. कुशाण राजे
- कुशाण हे मध्य आशियातून भारतात आलेले राजे होते.
- इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुशाण राजांनी काश्मीर आणि वायव्य भारतात सत्ता स्थापन केली.
- कुशाण राजांनी सोन्याची नाणी तयार करण्याची प्रथा सुरू केली.
- त्यांच्या नाण्यांवर गौतम बुद्ध आणि भारतीय देवतांच्या प्रतिमा कोरल्या जात.
सम्राट कनिष्क
- कुशाण राजांमध्ये कनिष्क हा सर्वात प्रसिद्ध राजा होता.
- त्याचे साम्राज्य काबूलपासून वाराणसीपर्यंत पसरले होते.
- त्याच्या काळात बौद्ध धर्माची चौथी बौद्ध परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली.
- कनिष्काच्या दरबारात प्रसिद्ध कवी अश्वघोष होता, ज्याने ‘बुद्धचरित’ आणि ‘वज्रसूचि’ ग्रंथ लिहिले.
- त्याच्या दरबारात चरक नावाचा वैद्य होता, जो आयुर्वेद तज्ज्ञ होता.
- कनिष्काने काश्मीरमध्ये ‘कनिष्कपूर’ हे शहर वसवले.
४. गुप्त राजघराणे
- गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त होता.
- गुप्त राजांनी सुमारे 300 वर्षे उत्तर भारतावर राज्य केले.
- गुप्त काळात कला, विज्ञान आणि साहित्याची भरभराट झाली.
- समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे सर्वात प्रसिद्ध गुप्त सम्राट होते.
समुद्रगुप्त
- समुद्रगुप्त हा एक शूर योद्धा होता.
- त्याने पंजाब, आसाम आणि दक्षिण भारतातील काही भाग जिंकला.
- त्याला ‘भारताचा नेपोलियन’ असेही म्हटले जाते.
- त्याच्या पराक्रमाचे वर्णन ‘प्रयागप्रशस्ति’ (अलाहाबाद स्तंभलेख) मध्ये आहे.
- तो वीणावादनात प्रवीण होता, त्यामुळे त्याच्या नाण्यांवर त्याचा वीणा वाजवतानाचा फोटो आहे.
दुसरा चंद्रगुप्त (चंद्रगुप्त विक्रमादित्य)
- समुद्रगुप्ताचा पुत्र दुसरा चंद्रगुप्त होता.
- त्याने गुजरात, सौराष्ट्र आणि माळवा जिंकून साम्राज्य वाढवले.
- त्याने आपली मुलगी प्रभावती वाकाटक घराण्यातील राजा रुद्रसेन याच्याशी विवाह केला.
- त्याच्या काळात फाहियान हा चिनी प्रवासी भारतात आला.
- मेहरौली लोहस्तंभ त्याच्या काळातील महत्त्वाचा पुरावा आहे.
५. वर्धन राजघराणे
- गुप्त साम्राज्यानंतर वर्धन राजघराण्याचा उदय झाला.
- हर्षवर्धन हा सर्वात प्रसिद्ध वर्धन राजा होता.
हर्षवर्धन
- त्याने आपले राज्य नेपाळ, नर्मदा नदी, आसाम आणि गुजरातपर्यंत वाढवले.
- त्याच्या दरबारात बाणभट्ट नावाचा कवी होता, ज्याने ‘हर्षचरित’ नावाचा ग्रंथ लिहिला.
- हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि इतर धर्मांनाही आश्रय दिला.
- त्याने ‘रत्नावली’, ‘नागानंद’ आणि ‘प्रियदर्शिका’ ही संस्कृत नाटके लिहिली.
- युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू हर्षवर्धनाच्या काळात भारतात आला.
- तो नालंदा विद्यापीठात दोन वर्षे राहिला आणि बौद्ध ग्रंथांचे भाषांतर केले.
६. ईशान्य भारतातील राजसत्ता
- प्राचीन काळी आसाम भागात ‘कामरूप’ राज्य होते.
- कामरूप राज्याचा संस्थापक पुष्यवर्मन होता.
- या राज्याचा उल्लेख महाभारत आणि रामायण ग्रंथात ‘प्राग्ज्योतिषपूर’ या नावाने केला आहे.
- युआन श्वांग भारतभर फिरला आणि कामरूप राज्यालाही भेट दिली.
- त्यावेळी भास्करवर्मन हा कामरूपचा राजा होता.
Leave a Reply