लहान प्रश्न
1. जैन धर्माचा संस्थापक कोण होता?
➝ वर्धमान महावीर.
2. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते?
➝ गौतम बुद्ध.
3. महावीरांना ‘जिन’ का म्हणतात?
➝ कारण त्यांनी विकारांवर विजय मिळवला होता.
4. गौतम बुद्धांना ‘बुद्ध’ का म्हटले जाते?
➝ कारण त्यांना ज्ञानप्राप्ती (बोधि) झाली होती.
5. जैन धर्माचे मुख्य तत्त्व कोणते आहे?
➝ अहिंसा.
6. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले?
➝ सारनाथ येथे.
7. बौद्ध धर्माचे प्रमुख तीन तत्वे कोणती?
➝ बुद्ध, धम्म, संघ (त्रिशरण).
8. जैन धर्मातील पंचमहाव्रते कोणती आहेत?
➝ अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य.
9. बौद्ध धर्मातील पंचशील नियम कोणते आहेत?
➝ कोणत्याही प्राण्याला मारू नये, चोरी करू नये, असत्य बोलू नये, अनैतिक आचरण करू नये, मादक पदार्थांचे सेवन करू नये.
10. इस्लाम धर्माचा प्रमुख ग्रंथ कोणता आहे?
➝ कुरआन.
11. ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे?
➝ बायबल.
12. पारशी धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते आहे?
➝ अग्यारी.
13. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला?
➝ लुंबिनी (नेपाळ).
14. महावीरांचा जन्म कोठे झाला?
➝ कुंडग्राम (वैशाली, बिहार).
15. बौद्ध भिक्षूंच्या संघाला काय म्हणतात?
➝ बौद्धसंघ.
लांब प्रश्न
1. महावीरांनी कोणता संदेश दिला?
➝ महावीरांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य यांचे पालन करून साधे व संयमी जीवन जगावे, माणसाचे मोठेपण त्याच्या आचरणावर ठरते, असे सांगितले.
2. गौतम बुद्धांनी कोणते शिकवण दिली?
➝ बुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्ग शिकवून लोभ, तृष्णा आणि मोह सोडल्यास माणूस दुःखमुक्त होतो, असे सांगितले.
3. त्रिरत्ने कोणती आहेत?
➝ त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन (योग्य दृष्टिकोन), सम्यक ज्ञान (योग्य ज्ञान) आणि सम्यक चारित्र (योग्य आचरण), जे मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक आहेत.
4. चार आर्यसत्ये कोणती आहेत?
➝ जीवन दुःखमय आहे, दुःखाला कारण असते, दुःख नष्ट करता येते, आणि दुःख निवारणासाठी अष्टांगिक मार्ग आहे, असे बुद्धांनी सांगितले.
5. पंचशील नियम कोणते आहेत?
➝ कोणत्याही प्राण्याला मारू नये, चोरी करू नये, असत्य बोलू नये, अनैतिक आचरण टाळावे आणि मादक पदार्थांचे सेवन करू नये, असे पंचशील नियम आहेत.
6. इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते?
➝ इस्लाम धर्मात अल्लाह एकच आहे, पैगंबर मुहम्मद त्याचे प्रेषित आहेत, आणि प्रत्येकाने प्रामाणिकपणे जीवन जगावे, असे सांगितले आहे.
7. ख्रिश्चन धर्मात काय शिकवले जाते?
➝ ख्रिश्चन धर्मात देव सर्वांचा प्रेमळ पिता आहे, प्रत्येकाने एकमेकांवर प्रेम करावे, क्षमा करावी आणि चांगले आचरण ठेवावे, असे सांगितले आहे.
8. पारशी धर्माची मुख्य तत्त्वे कोणती आहेत?
➝ पारशी धर्मात उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या तीन तत्त्वांचे पालन करावे, असे सांगितले आहे.
Leave a Reply