स्वाध्याय
(अ) पुढील कार्यासाठी कोणते साधन वापरावे लागेल?
1. रोहनला पतंग उडवायचा आहे.
- वाऱ्याची ऊर्जा.
2. आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे.
- लाकूड आणि कोळसा.
3. सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे.
- गॅस सिलिंडर किंवा सौर कुकर.
4. सलमाला कपड्यांना इस्त्री करायची आहे.
- वीज.
5. रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे.
- कोळसा किंवा डिझेल.
6. अंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे.
- गॅस, सौरऊर्जा किंवा लाकूड.
7. सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे.
- वीज किंवा सौर दिवे.
(ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो? त्याचे कारण काय असेल?
- खनिज तेल व वीज. कारण वाहने, घरगुती उपकरणे आणि उद्योगधंद्यांसाठी यांचा जास्त वापर होतो.
2. ऊर्जा साधनांची गरज काय?
- ऊर्जेशिवाय आपले जीवन अशक्य आहे. ती वाहने, घरगुती कामे, शेती व उद्योगधंद्यांसाठी लागते.
3. पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे?
- कारण ही साधने प्रदूषण करत नाहीत आणि निसर्गातून सतत उपलब्ध होतात.
(क) खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.
ऊर्जा साधन | उपलब्धता | पर्यावरणपूरकता | फायदे आणि तोटे |
---|---|---|---|
खनिज तेल | मर्यादित प्रमाणात | नाही (प्रदूषण होते) | उष्णता आणि वीज निर्माण होते, पण महाग आहे |
सौरऊर्जा | मुबलक प्रमाणात | होय (स्वच्छ ऊर्जा) | पर्यावरणपूरक आहे, पण उपकरणे महाग आहेत |
जलऊर्जा | मुबलक प्रमाणात | होय | स्वच्छ ऊर्जेचा स्रोत, पण मोठे प्रकल्प महाग असतात |
भूगर्भीय ऊर्जा | काही ठिकाणीच | होय | सतत मिळते, पण मोठ्या प्रमाणात वापरणे कठीण आहे |
Leave a Reply