स्वाध्याय
(1) द्विमित आणि त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर :
द्विमितीय साधने:
- यामध्ये फक्त लांबी आणि रुंदी असते.
- उदा. – कागद, फळा, नकाशा, टेबल.
त्रिमितीय साधने:
- यामध्ये लांबी, रुंदी आणि उंची असते.
- उदा. – पृथ्वीगोल, डबा, डोंगर, चंद्र.
(2) अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील?
उत्तर :
छोट्या पृथ्वीगोलावर खालील गोष्टी दाखवता येतात:
- खंड आणि महासागर.
- विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त आणि ध्रुव.
- काही प्रमुख देश आणि त्यांची राजधानी.
(3) पृथ्वीवर होणाऱ्या दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल?
उत्तर :
पृथ्वीगोलाच्या मदतीने दिवस व रात्रीची संकल्पना समजून घेणे सोपे होते.
- पृथ्वी सूर्यासमोर फिरते त्यामुळे दिवस आणि रात्र होते.
- नकाशावर ही संकल्पना दाखवता येत नाही.
(4) तुमचे गाव/शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल?
उत्तर :
नकाशा उपयोगी पडेल.
- कारण नकाशात गाव, शहर, रस्ते आणि नद्या सविस्तर दाखवल्या जातात.
(5) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते?
उत्तर :
नकाशा सहज नेता येतो.
- कारण नकाशा हलका आणि फोल्ड करता येणारा असतो.
- पृथ्वीगोल मोठा आणि वाहून नेण्यासाठी कठीण असतो.
Leave a Reply