लहान प्रश्न
1. पृथ्वीगोल म्हणजे काय?
- पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरूप असलेली गोलाकृती वस्तू म्हणजे पृथ्वीगोल.
2. नकाशा कोणत्या प्रकारचा असतो?
- नकाशा द्विमितीय (2D) असतो.
3. पृथ्वीगोल कोणत्या प्रकारचा असतो?
- पृथ्वीगोल त्रिमितीय (3D) असतो.
4. नकाशा आणि पृथ्वीगोल यातील मुख्य फरक काय?
- नकाशा सपाट असतो, तर पृथ्वीगोल गोलसर असतो.
5. पृथ्वीचे पूर्ण स्वरूप एकाच वेळी कोणत्या साधनाने पाहता येते?
- पृथ्वीगोलावरून.
6. पृथ्वीची फक्त एक बाजू एकावेळी कोणत्या साधनाने पाहता येते?
- नकाशाद्वारे.
7. विशिष्ट प्रदेशाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी कोणते साधन वापराल?
- नकाशा.
8. द्विमितीय म्हणजे काय?
- ज्या वस्तूला फक्त लांबी आणि रुंदी असते, त्याला द्विमितीय म्हणतात.
9. त्रिमितीय म्हणजे काय?
- ज्या वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते, त्याला त्रिमितीय म्हणतात.
10. पृथ्वीचा नकाशा कसा तयार करतात?
- त्रिमितीय पृथ्वीगोलावरून प्रकाशाच्या साहाय्याने द्विमितीय नकाशा तयार करतात.
11. पृथ्वीगोल आणि नकाशाचा वापर कशासाठी केला जातो?
- पृथ्वीगोलाचा वापर संपूर्ण पृथ्वी समजण्यासाठी आणि नकाशाचा वापर विशिष्ट प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी होतो.
12. ‘अर्था’ हा पृथ्वीगोल कोणत्या देशात आहे?
- अमेरिका.
लांब प्रश्न
1. पृथ्वीगोल व नकाशा यांच्यात काय फरक आहे?
- पृथ्वीगोल त्रिमितीय असून संपूर्ण पृथ्वीचे प्रतिक आहे, तर नकाशा द्विमितीय असून विशिष्ट भागाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वापरला जातो.
2. भौगोलिक सहल म्हणजे काय?
- एखाद्या ठिकाणाची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती समजण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन पाहणे म्हणजे भौगोलिक सहल.
3. त्रिमितीय आणि द्विमितीय साधनांची वैशिष्ट्ये काय?
- द्विमितीय साधनांना लांबी व रुंदी असते (उदा. नकाशा), तर त्रिमितीय साधनांना लांबी, रुंदी व उंची असते (उदा. पृथ्वीगोल).
4. क्षेत्रभेट का महत्त्वाची असते?
- क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते आणि स्थानिक लोकांशी संवाद साधून अधिक माहिती मिळते.
5. पृथ्वीचा नकाशा तयार करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात?
- प्रकाशाच्या साहाय्याने त्रिमितीय पृथ्वीगोलाचा प्रतिमा द्विमितीय कागदावर प्रक्षेपित करून नकाशा तयार केला जातो.
Leave a Reply