डॉ. कलाम यांचे बालपण
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते. त्यांचे बालपण रामेश्वरम या छोट्या गावात गेले. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय आणि धार्मिक होते. त्यांच्या जीवनावर आई-वडिलांचा मोठा प्रभाव पडला. आईने त्यांना दयाळूपणा शिकवला, तर वडिलांनी प्रामाणिकपणा आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. लहानपणी लेखकाला पुस्तके वाचण्याची खूप आवड होती, पण गावात फारशी पुस्तके नव्हती. मात्र, एस.टी.आर. माणिकम नावाच्या राष्ट्रभक्ताकडे पुस्तके होती. त्यांनी लेखकाला वाचनाची सवय लावली.
डॉ. कलाम यांनी लहानपणीच काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी चिंचोके गोळा करून विकले. त्यानंतर शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाच्या मदतीने वर्तमानपत्र वाटण्याचे काम केले. हे त्यांचे पहिले कष्टाने कमावलेले पैसे होते. पुढे शिक्षणासाठी त्यांना रामनाथपुरमला जावे लागले. सुरुवातीला नवीन ठिकाणी त्यांना जड गेले, कारण तेथे त्यांच्या गावासारखे प्रेमळ वातावरण नव्हते. पण वडिलांनी त्यांना समजावले की, मोठे होण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले आणि शिक्षणात लक्ष दिले.
डॉ. कलाम यांना त्यांच्या बालपणातील संघर्षांमुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांनी मेहनत, जिद्द आणि शिक्षण या मूल्यांचे पालन केले. त्यांच्या जीवनाचा प्रभाव शमसुद्दीन आणि जलालुद्दीन यांच्यासारख्या मार्गदर्शकांनीही टाकला. त्यांनी जीवनभर प्रामाणिकपणा, कष्ट आणि चांगल्या सवयींचा अवलंब केला. त्यांच्या या संघर्षमय बालपणामुळेच ते पुढे जाऊन भारताचे महान वैज्ञानिक आणि राष्ट्रपती झाले. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की, मेहनतीने आणि जिद्दीने कोणतेही ध्येय गाठता येते.
Leave a Reply