डॉ. कलाम यांचे बालपण
लहान प्रश्न
1. डॉ. अब्दुल कलाम कोण होते?
➤ ते भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध वैज्ञानिक होते.
2. डॉ. कलाम यांचे आत्मचरित्र कोणते आहे?
➤ विंग्ज ऑफ फायर
3. त्यांनी कोणते महत्त्वाचे पुरस्कार मिळवले?
➤ पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न
4. लेखकाच्या घरी पुस्तकांचा संग्रह होता का?
➤ नाही, गावातील एस.टी.आर. माणिकम यांच्या घरी पुस्तकांचा संग्रह होता.
5. लेखकाला पहिले पैसे कसे मिळाले?
➤ त्यांनी चिंचोके विकून पहिले पैसे कमावले.
6. शमसुद्दीन कोण होते?
➤ ते लेखकाच्या दूरच्या नातेवाईक होते आणि वर्तमानपत्र वितरक होते.
7. लेखक शिक्षणासाठी कोठे गेले?
➤ रामनाथपुरम येथे
8. लेखकाचे वडील त्यांना काय शिकवायचे?
➤ प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त
9. लेखकाचे आईवडील त्यांना काय म्हणाले?
➤ शिक्षणासाठी गाव सोडायला हवे, मोठे होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
10. लेखकाला रामनाथपुरममध्ये सुरुवातीला का रमले नाही?
➤ तेथे घरासारखे प्रेमळ वातावरण नव्हते.
लांब प्रश्न
1. लेखकाच्या लहानपणी वर्तमानपत्रे लोक कशासाठी वाचत असत?
➤ काहीजण सोन्या-चांदीचे दर समजण्यासाठी, काहीजण राजकीय बातम्या आणि काही इतिहास समजण्यासाठी वर्तमानपत्र वाचत.
2. शमसुद्दीनचा व्यवसाय कसा होता आणि त्याचा लेखकावर काय प्रभाव पडला?
➤ तो एकमेव वर्तमानपत्र वितरक होता. लेखकाने त्याच्यासोबत वर्तमानपत्रे गोळा करून पहिली कमाई केली.
3. डॉ. कलाम यांचे वडील त्यांना शिक्षणाबाबत काय सांगतात?
➤ ते म्हणाले की, मोठे व्हायचे असेल, तर गाव सोडून बाहेर शिक्षण घ्यावे लागेल.
4. लेखकाला रामनाथपुरममध्ये का रमत नव्हते आणि त्यांनी कसे जुळवून घेतले?
➤ तेथे एकजिनसीपणा नव्हता, पण त्यांनी वडिलांच्या अपेक्षांमुळे परिस्थिती स्वीकारली.
5. लेखकाचे जीवन जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांच्यामुळे कसे घडले?
➤ जलालुद्दीनकडून शहाणपण, शमसुद्दीनकडून निरीक्षणशक्ती आणि मेहनत शिकली.
6. डॉ. कलाम यांना त्यांच्या बालपणी कोणते महत्त्वाचे संस्कार मिळाले?
➤ वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि शिस्त, आईकडून दयाळूपणा आणि चांगल्यावर विश्वास ठेवण्याची ताकद मिळाली.
Leave a Reply