सफर मेट्रोची
1. मेट्रो ट्रेन कशावर चालते?
➤ मेट्रो ट्रेन विजेवर चालते.
2. मेट्रो प्रवास का सोयीस्कर आहे?
➤ मेट्रो वेगवान, सुरक्षित आणि स्वच्छ आहे.
3. मेट्रो पायलट कोणत्या शिक्षण शाखेतून येतात?
➤ मेट्रो पायलट होण्यासाठी अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शिक्षण आवश्यक असते.
4. मेट्रोमध्ये दरवाजे कोण उघडतो आणि बंद करतो?
➤ मेट्रोचे दरवाजे स्वयंचलितपणे उघडतात, पण बंद करण्याचे नियंत्रण पायलटकडे असते.
5. रुपाली चव्हाण कोण आहेत?
➤ रुपाली चव्हाण या भारतातील पहिल्या महिला मेट्रो पायलट आहेत.
6. रुपाली चव्हाण यांनी शिक्षण कोठे पूर्ण केले?
➤ त्यांनी सिंधुदुर्गमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतले.
7. मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या चाचण्या द्याव्या लागतात?
➤ लेखी परीक्षा, मानसिक आणि शारीरिक चाचणी आणि मुलाखत द्यावी लागते.
8. मेट्रोच्या एका गाडीत किती प्रवासी प्रवास करू शकतात?
➤ एका मेट्रोमध्ये साधारण १५०० प्रवासी प्रवास करू शकतात.
9. मेट्रो कोणत्या वेळेत चालते?
➤ मेट्रो सकाळी ५:२० पासून रात्री १२ वाजेपर्यंत चालते.
10. मेट्रोमध्ये टिकीट घेण्यासाठी कोणती सुविधा आहे?
➤ मेट्रोसाठी टोकन किंवा प्रीपेड कार्डचा वापर केला जातो.
11. मेट्रो लोकल ट्रेनपेक्षा कशी वेगळी आहे?
➤ मेट्रो वातानुकूलित असते, तिचे दरवाजे स्वयंचलित असतात आणि ती फक्त विजेवर चालते.
12. मेट्रो प्रवास कोणत्या प्रकारे सुरक्षित आहे?
➤ मेट्रोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित दरवाजे आणि तिकीट प्रवेश यंत्रणा असते.
13. मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणते टप्पे पूर्ण करावे लागतात?
➤ अभियांत्रिकी शिक्षण, लेखी परीक्षा, मानसिक आणि शारीरिक चाचणी, मुलाखत आणि एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.
14. पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपाली चव्हाण यांना कसे वाटले?
➤ त्यांना थोडी भीती वाटली, पण आत्मविश्वासाने त्यांनी जबाबदारी पार पाडली आणि मेट्रो व्यवस्थित चालवली.
15. मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपाली चव्हाण यांच्यासाठी विशेष का होता?
➤ त्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर प्रवास करत होते, त्यामुळे तो दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला.
Leave a Reply