आपली सुरक्षा, आपले उपाय!
1. दीपा धावतपळत घरी का आली?
➤ तिने शेजारी गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याचे पाहिले आणि घाबरली.
2. स्फोटानंतर लोकांनी काय केले?
➤ लोकांनी पाण्याच्या बादल्या आणि माती घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.
3. आईने दीपाला काय समजावले?
➤ आईने तिला घाबरू नको सांगितले आणि वैद्यकीय प्रगतीबद्दल माहिती दिली.
4. आग लागण्याची कारणे कोणती असतात?
➤ गॅस गळती, विजेचा शॉर्टसर्किट, जळणाऱ्या वस्तू आणि निष्काळजीपणा.
5. वीजेच्या उपकरणांचा वापर करताना काय काळजी घ्यावी?
➤ इस्त्री, गिझर, मोबाईल चार्जिंग वापरताना योग्य काळजी घ्यावी.
6. घरात आग लागली तर काय करावे?
➤ रांगत बाहेर जावे, पाणी किंवा वाळू टाकावी, आणि 101 वर फोन करावा.
7. घरात वीज प्रवाहामुळे आग लागू नये म्हणून काय टाळावे?
➤ एका बोर्डवर अनेक प्लग लावणे आणि खराब वायरचा वापर करणे टाळावे.
8. आग आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या वस्तू वापरतात?
➤ पाणी, वाळू, माती आणि अग्निशमन यंत्र.
9. रेल्वे स्टेशन आणि एस.टी. स्थानकांवर वाळूच्या बादल्या का ठेवतात?
➤ आग लागल्यास त्वरित ती विझवण्यासाठी.
10. घरातून बाहेर जाताना कोणती दक्षता घ्यावी?
➤ विजेचे दिवे, उपकरणे आणि गॅस बंद करावा.
Leave a Reply