समता आणि न्याय
लघु प्रश्न
1.समता म्हणजे काय?
उत्तर: समता म्हणजे सर्व माणसांना समान वागणूक मिळावी असा विचार.
2. नैसर्गिक असमानता म्हणजे काय?
उत्तर: वर्ण, उंची, बुद्धिमत्ता यासारखे निसर्गाने दिलेले फरक म्हणजे नैसर्गिक असमानता.
3. ॲरिस्टॉटल यांनी समतेबद्दल काय सांगितले?
उत्तर: ॲरिस्टॉटल यांनी समता ही फक्त नगरराज्यातील नागरिकांपुरती मर्यादित आहे असे सांगितले.
4. राजकीय समतेचा आधार काय आहे?
उत्तर: सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आणि प्रतिनिधित्वाचे कायदे हे राजकीय समतेचा आधार आहेत.
5. कार्ल मार्क्स यांनी कोणत्या समतेचा विचार मांडला?
उत्तर: कार्ल मार्क्स यांनी समाजवादी समता आणि वर्गविहीन समाजाचा विचार मांडला.
6.सामाजिक न्यायाला दुसरे नाव काय आहे?
उत्तर: सामाजिक न्यायाला वितरणात्मक न्याय असेही म्हणतात.
7. नैसर्गिक न्यायाचा मुख्य विचार काय आहे?
उत्तर: नैसर्गिक न्याय म्हणजे माणसाला योग्य-अयोग्य सहज समजते, त्यासाठी कायद्याची गरज नाही.
8. जॉन रॉल्स यांनी कोणता सिद्धांत मांडला?
उत्तर: जॉन रॉल्स यांनी वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडला.
9. भारतात सामाजिक समतेसाठी कोणी प्रयत्न केले?
उत्तर: महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.
10. आर्थिक समता म्हणजे काय?
उत्तर: आर्थिक समता म्हणजे सर्वांना विकासाची समान संधी आणि शोषणाचा अभाव.
दीर्घ प्रश्न
1. समतेचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? थोडक्यात सांगा.
उत्तर: समतेचे पाच प्रकार आहेत:
- नैसर्गिक समता: निसर्गाने सर्व माणसे समान आहेत, भेदभाव नको, सर्वांना विकासाची संधी मिळावी.
- नागरी समता: सर्वांना कायद्यापुढे समान हक्क मिळावेत, वंश-जात-धर्मावर भेदभाव नको.
- राजकीय समता: प्रत्येकाला शासनात सहभागी होण्याची समान संधी मिळावी, हे लोकशाहीत शक्य आहे.
- आर्थिक समता: सर्वांना विकासाची संधी, शोषण नको आणि संपत्तीचे केंद्रीकरण थांबवणे.
- सामाजिक समता: जात, धर्म, लिंग यावर भेदभाव नको, सर्वांना समान दर्जा मिळावा.
2. ॲरिस्टॉटल आणि हॉब्ज यांनी समतेबद्दल काय विचार मांडले?
उत्तर:
- ॲरिस्टॉटल: त्यांनी समता ही फक्त नगरराज्यातील नागरिकांसाठी आहे असे सांगितले. शासक आणि शासित यांच्यात नैसर्गिक विषमता आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी कायद्यापुढील समानतेचा विचार मांडला आणि ‘द पॉलिटिक्स’ मध्ये समता-न्यायाचा संबंध स्पष्ट केला.
- हॉब्ज: त्यांनी ‘लेव्हिएथन’ मध्ये नैसर्गिक समतेचा विचार मांडला. शारीरिक आणि बौद्धिक विषमता असली तरी प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून समान हक्क मिळावेत असे त्यांचे मत होते. शासन हे हक्क काढून घेऊ शकत नाही.
3. सामाजिक समतेचे महत्त्व काय आहे? भारताच्या संदर्भात सांगा.
उत्तर: सामाजिक समतेमुळे समाजात भेदभाव कमी होतो आणि सर्वांना समान दर्जा मिळतो. यामुळे बंधुभाव वाढतो आणि व्यक्तीला आत्मसन्मान मिळतो. भारतात जात, धर्म, लिंग यावर भेदभाव आहे. म्हणून महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी लढा दिला. भारतात अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कायदे झाले आणि मागासवर्गीयांना सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न झाले. सामाजिक समता नसेल तर स्वातंत्र्य आणि न्याय मिळणे कठीण आहे.
4. न्यायाचे प्रकार कोणते आहेत? प्रत्येकाचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर: न्यायाचे तीन मुख्य प्रकार आहेत:
- नैसर्गिक न्याय: माणसाला योग्य-अयोग्य समजते, कायद्याची गरज नाही. ग्रीक-रोमन तत्त्वज्ञांनी याचा पुरस्कार केला.
- वैधानिक न्याय: कायद्याच्या रूपाने न्यायाची अंमलबजावणी होते. कायदा निःपक्षपाती आणि नियमांवर आधारित असावा.
- सामाजिक न्याय: वस्तू आणि सेवांचे समतेच्या आधारावर वाटप होते, कमकुवत गटांना योग्य वाटा मिळावा याला वितरणात्मक न्याय म्हणतात.
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायाबद्दल काय विचार मांडले?
उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करणे म्हणजे न्याय असे सांगितले. त्यांनी जातिव्यवस्था आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेत बदल हवा असे मत मांडले. साधनसंपत्तीचे समान वाटप आणि सामाजिक न्याय यावर त्यांचा भर होता. त्यांनी संविधानातून प्रक्रियात्मक आणि सामाजिक न्याय साध्य करण्याचा मार्ग दाखवला. ते म्हणाले, “राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक लोकशाही हवी, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे जीवनात आणली पाहिजेत.”
Leave a Reply