Question Answers For All Chapters – इतिहास Class 11
दक्षिण भारतातील राजसत्ता
प्र.१ (अ) खालील योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
१. वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा ………. हा होता.
(अ) सर्वसेन (ब) प्रवरसेन
(क) जयसिंग (ड) चंद्रगुप्त
उत्तर – (ब) प्रवरसेन
२. दुसरा पुलकेशीनेदक्षिण दिग्विजय करून ………. हे बिरुद धारण केले.
(अ) ‘परमेश्वर’ (ब) ‘विषयपती’
(क) ‘देशाधिपती’ (ड) सत्याजय
उत्तर – (अ) ‘परमेश्वर’
३. कालिदासाने ………. हे काव्य नागपूरजवळील रामटेक या ठिकाणी रचले.
(अ) शाकुंतल (ब) मेघदूत
(क) मालविकाग्नीमित्र (ड) हरिविजय
उत्तर – (ब) मेघदूत
४. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ………. काळात झाली.
(अ) चालुक्य (ब) पल्लव
(क) चेर (ड) राष्ट्रकूट
उत्तर – (ड) राष्ट्रकूट
(ब) ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
अ’ गट | ‘ब’ गट |
१. सेतुबंध काव्य | पाणिनी |
२. हरिविजय ग्रंथ | सर्वसेन |
३. इंडिका ग्रंथ | मेगॅस्थेनिस |
४. संगीतरत्नाकर | शारंगदेव |
उत्तर – १. अष्टाध्यायी – पाणिनी
प्र.२ खालील विधाने सकारण स्पष्ट करा.
१. दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली.
उत्तर – स्पष्टीकरण: चालुक्य घराण्याने दक्षिण भारतात सुमारे दोनशे वर्षे राज्य केले. सहाव्या शतकाच्या सुरुवातीला जयसिंगने वातापी (बदामी) येथे राजधानी स्थापन करून चालुक्य सत्तेचा पाया घातला. त्याचा नातू पहिला पुलकेशी याने अश्वमेध यज्ञ करून ‘महाराज’ ही पदवी धारण केली आणि राज्याचा विस्तार केला. त्यानंतर दुसरा पुलकेशी हा सर्वांत महान राज्यकर्ता ठरला. त्याने कदंब, मौर्य, नल, कलचुरी, राष्ट्रकूट, लाट, मालव, गुर्जर यांसारख्या अनेक राजांचा पराभव करून विदर्भ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या विस्तीर्ण प्रदेशांवर सत्ता प्रस्थापित केली. सम्राट हर्षवर्धनाचा पराभव करून त्याने ‘परमेश्वर’ हे बिरुद धारण केले आणि नर्मदेपासून कावेरीपर्यंत साम्राज्य विस्तारले. या पराक्रमांमुळे चालुक्यांची सत्ता दक्षिण भारतात प्रबळ बनली.
२. महाराष्ट्राच्या इतिहासात यादव कालखंडाला महत्त्व आहे.
उत्तर – स्पष्टीकरण: यादव घराणे हे मध्ययुगीन महाराष्ट्रातील महत्त्वाचे घराणे होते. पाचवा भिल्लम याने कलचुरींचा पराभव करून आणि सिंघण राजाने होयसळ व शिलाहारांचा पराभव करून यादव सत्तेचा विस्तार केला. देवगिरी येथे राजधानी स्थापन करून त्यांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली. यादव कालखंडात सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती झाली; महानुभाव आणि वारकरी पंथ उदयास आले. ‘लीळाचरित्र’, ‘विवेकसिंधु’, ‘ज्ञानेश्वरी’ यांसारखे मराठी ग्रंथ आणि ‘संगीतरत्नाकर’सारखे संस्कृत ग्रंथ रचले गेले. हेमाडपंती मंदिरे, किल्ले यांची निर्मितीही या काळात झाली. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्राच्या इतिहासात यादव कालखंडाला विशेष महत्त्व आहे.
प्र.३ टीपा लिहा.
१. दक्षिण भारतातील राज्यव्यवस्था
उत्तर –
- दक्षिणेतील राज्यव्यवस्थेत ‘महादंडनायक’, ‘राष्ट्रिक’, ‘देशाधिकृत’, ‘अमात्य’, ‘आयुक्त’ असे अधिकारी होते.
- चोळांच्या राज्यात अधिकाऱ्यांच्या मंडळाला ‘उदानकुट्टम’ असे म्हणत असे.
- राज्य अनेक ‘मंडलम्’ नावाच्या प्रांतात विभागलेले असे, ज्यांचे अधिकारी राजघराण्यातील सदस्य असत.
- ‘विषयपती’, ‘देशाधिपती’, ‘राष्ट्रिक’ हे अधिकारी प्रांताच्या प्रमुखाच्या हाताखाली काम करत.
- प्रशासन कार्यक्षम होते; प्रत्येक हुकमाची नोंद दप्तरी घेऊन अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीनंतरच कार्यवाही होत असे.
- स्वायत्त ग्रामसंस्था हे वैशिष्ट्य होते; ग्रामसभा गावाचा कारभार पाहत असे आणि ‘ग्रामभोजक’ किंवा ‘ग्रामकूट’ हे प्रमुख असत.
- ग्रामप्रमुखाची निवड गावकरी किंवा राजा करत असे; जिल्हा व प्रांत पातळीवरही सभा असत.
- जमीन महसूल हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत होता, तसेच जकात, व्यवसाय कर, यात्रा कर यांचाही समावेश होता.
२. दक्षिण भारतातील नाणी
उत्तर –
- मौर्य काळात दक्षिण भारतात मौर्यांची नाणी चलनात होती.
- मौर्यांच्या अस्तानंतर पांड्यांनी स्वतःची आहत नाणी पाडली; त्यावर सूर्य, घोडा, स्तूप, वृक्ष, मासा अशा आकृत्या होत्या.
- चेरांच्या नाण्यांवर एका बाजूला धनुष्यबाण आणि दुसऱ्या बाजूला हत्तीची आकृती कोरलेली असे.
- चोळांची नाणी सोन्याची व चांदीची होती; त्यावर व्याघ्र हे राजचिन्ह आणि देवनागरी लिपीतील मजकूर असे.
- राजराजा या चोळ राजाची सोन्याची, चांदीची, तांब्याची नाणी मिळाली असून त्यावर त्याची प्रतिमा व व्याघ्र आकृती आहे.
- रोमशी व्यापारामुळे रोमन नाणीही सापडतात; त्यावर भारतीय राजांचे शिक्के उमटवून पुन्हा चलनात आणले जात होते.
प्र.४ दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
शिलाहार घराण्याविषयी माहिती लिहा.
(अ) संस्थापक:
उत्तर – शिलाहार घराण्याच्या तीनही शाखांचे आद्यपुरुष म्हणून जीमूतवाहन याचा उल्लेख आढळतो. प्रत्येक शाखेची स्थापना वेगवेगळ्या राजांनी केली असली, तरी संपूर्ण घराण्याचा इतिहास या नावाशी जोडलेला आहे.
(ब) दक्षिण कोकणचे शिलाहार:
उत्तर – दक्षिण कोकणातील शिलाहारांची सत्ता सणफुल्ल या राजाने स्थापन केली. त्याचा मुलगा धम्मियार याने बालिपट्टण हे गाव वसवले आणि तेथे किल्ला बांधला. पुढे आदित्यवर्मा या राजाने आपले राज्य ठाण्यापासून गोव्यापर्यंत वाढवले. या घराण्याचा शेवटचा राजा रट्टराज होता. खारेपाटणच्या ताम्रपटावरून या शाखेचा इतिहास समजतो.
(क) उत्तर कोकणचे शिलाहार:
उत्तर – उत्तर कोकणातील शिलाहार शाखा कपर्दी या राजाने स्थापन केली. ही शाखा प्रारंभी राष्ट्रकूटांची मांडलिक होती आणि त्यांची राजधानी स्थानक (ठाणे) येथे होती. अपराजित हा महत्त्वाचा राजा असून त्याने सुमारे ३५ वर्षे राज्य केले. पुढे छित्तराज याने राज्य केले, परंतु त्याच्या भावांमध्ये राज्यासाठी भांडणे झाली. याचा फायदा घेऊन कोल्हापूरचे शिलाहार आणि कदंब यांनी काही प्रदेश जिंकले. छित्तराजाचा भाऊ मुम्मुणि याने अंबरनाथ येथील आम्रेश्वर महादेवाचे भव्य मंदिर बांधले, जे भूमिज शैलीतील प्रारंभ मानले जाते.
(ड) कोल्हापूरचे शिलाहार:
उत्तर – कोल्हापूर शाखेची स्थापना जतिग याने केली. या शाखेचा प्रभाव सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि बेळगाव या जिल्ह्यांत होता. राजा भोज (दुसरा) हा या घराण्यातील महत्त्वाचा राजा होता. कोल्हापूर, वळीवडे आणि पन्हाळा ही त्यांच्या राजधानीची शहरे होती. खिद्रापूर येथील कोप्पेश्वर महादेव मंदिराच्या निर्मितीचे श्रेय या शाखेकडे जाते.
Leave a Reply