आकाशी झेप घे रे
कवितेचा मुख्य आशय:
ही कविता परावलंबित्वाचा त्याग करून आत्मनिर्भरता आणि मेहनतीच्या महत्त्वावर भर देणारी आहे. कवीने पाखराच्या रूपकातून माणसाला धाडसाने उंच भरारी घेण्याची प्रेरणा दिली आहे.
१) आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा
- कवी पाखराला (माणसाला) उद्देशून सांगतात की, तू आकाशात मुक्त उडण्यासाठी निर्माण झाला आहेस.
- सोन्याचा पिंजरा म्हणजे ऐश्वर्य, सुरक्षितता, सोईसुविधा – याला चिटकून न राहता स्वबळावर जगावे.
२) तुजभवती बैभव, माया, फळ रसाळ मिळते खाया, सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा
- तुला ऐश्वर्य, प्रेम आणि भरपूर सुख मिळते आहे.
- तुला कोणत्याही कष्टाशिवाय मधुर फळे मिळत आहेत.
- त्यामुळे तुझा शरीर (मन) सुखलोलुप बनले आहे.
- पण किती काळ असे परावलंबी जीवन जगणार आहेस?
३) तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरि-डोंगर, हिरवी राने, जा ओलांडुनी या सरिता-सागरा
- देवाने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत, मग तू उडण्याचा प्रयत्न का करत नाहीस?
- सामर्थ्याने, धाडसाने आकाशात विहार कर.
- डोंगर-दऱ्या, हिरवी कुरणे, नद्या आणि समुद्र पार कर.
- याचा अर्थ, संकटांवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न कर.
४) कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा
- मेहनत केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा लाभ मिळत नाही.
- तुला हे समजतं, पण तू त्यानुसार वागत नाहीस.
- मनात अपूर्णत्वाची खंत असते.
- अशा स्थितीत तू संभ्रमित (confused) होतोस, दुःखी होतोस.
५) घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा
- मेहनतीच्या घामातून यशरूपी मोती फुलतात.
- मेहनतीच्या जोरावर जीवनात यश मिळते.
- मेहनतीमुळे संपूर्ण घर आनंदाने उजळून निघते.
- हा आनंददायक क्षण प्रत्येकाच्या जीवनात येऊ शकतो.
कवितेचा सारांश:
- कवीने सांगितले आहे की, सुखाच्या मोहात अडकून राहू नका.
- देवाने दिलेल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून उंच भरारी घ्या.
- मेहनतीशिवाय यश मिळत नाही, म्हणून धैर्याने कठोर परिश्रम करा.
- आत्मनिर्भर बना आणि स्वतःच्या कष्टाच्या फळाचा आनंद घ्या.
या कवितेचा संदेश:
- परावलंबित्व सोडून आत्मनिर्भर व्हावे.
- मेहनतीशिवाय जीवनात यश मिळत नाही.
- आपण आपले ध्येय गाठण्यासाठी धाडसाने प्रयत्न करायला हवेत.
- सुरक्षिततेच्या बंधनात राहण्यापेक्षा स्वतंत्र जीवन जगावे.
Leave a Reply