इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
लहान प्रश्न
1. इतिहासलेखन म्हणजे काय?
→ भूतकाळातील घटनांचे संशोधन करून त्यांची सुसंगत मांडणी करणे म्हणजे इतिहासलेखन.
2. सुमेर संस्कृतीचे इतिहासलेखनात महत्त्व काय आहे?
→ सुमेर संस्कृतीत सर्वप्रथम ऐतिहासिक घटनांची लेखी नोंद केली गेली.
3. व्हॉल्टेअरला ‘आधुनिक इतिहासलेखनाचा जनक’ का म्हणतात?
→ कारण त्याने इतिहासात केवळ राजकीय घटना नव्हे, तर सामाजिक व आर्थिक घटकांचाही विचार केला.
4. ‘द्वंद्ववाद’ ही संकल्पना कोणी मांडली?
→ जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल यांनी द्वंद्ववाद ही संकल्पना मांडली.
5. लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहासलेखनाबद्दल काय सांगितले?
→ इतिहासलेखन मूळ दस्तऐवजांवर आधारित असावे आणि त्यात कल्पनांचा समावेश नसावा.
6. कार्ल मार्क्स यांच्या मतानुसार इतिहास म्हणजे काय?
→ इतिहास हा वर्गसंघर्षाचा असून उत्पादनाच्या साधनांवर नियंत्रण ठेवणारे लोक इतरांचा शोषण करतात.
7. स्त्रीवादी इतिहासलेखन का महत्त्वाचे आहे?
→ कारण त्यातून स्त्रियांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय योगदान अधोरेखित होते.
8. अँनल्स प्रणाली काय आहे?
→ ही फ्रेंच इतिहासलेखन पद्धत असून त्यात हवामान, समाज, व्यापार यासारख्या घटकांचा विचार केला जातो.
9. फुको यांच्या “ज्ञानाचे पुरातत्त्व” संकल्पनेचा उद्देश काय आहे?
→ इतिहासाच्या अखंड कालक्रमानुसार मांडणी करण्याऐवजी सत्ताकारण आणि ज्ञानाच्या प्रवाहांचा अभ्यास करणे.
10. ग्रीक इतिहासकार हिरोडोटसला काय म्हणतात?
→ हिरोडोटसला “इतिहासाचा जनक” म्हणून ओळखले जाते.
दीर्घ प्रश्न
1. कार्ल मार्क्स यांच्या वर्गसंघर्ष सिद्धांताचा इतिहास अभ्यासावर कसा परिणाम झाला?
कार्ल मार्क्स यांच्या मते, समाज शोषक आणि शोषित अशा दोन वर्गांमध्ये विभागलेला आहे आणि उत्पादनाच्या साधनांवर नियंत्रण असणारा वर्ग इतरांचे शोषण करतो. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना सामाजिक आणि आर्थिक घटकांवर भर दिला गेला.
2. आधुनिक इतिहासलेखनाच्या चार वैशिष्ट्यांची माहिती द्या.
आधुनिक इतिहास शास्त्रशुद्ध असून तो विशिष्ट प्रश्नांवर आधारित असतो आणि त्यातील घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक पद्धतीने केले जाते. तसेच, इतिहास केवळ राजकीय घटना न राहता सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटनांवरही प्रकाश टाकतो.
3. स्त्रीवादी इतिहासलेखनाचा मुख्य उद्देश काय आहे?
पारंपरिक इतिहासात स्त्रियांचे योगदान दुर्लक्षित करण्यात आले होते, म्हणून स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय योगदान अभ्यासले जाते. यामुळे इतिहासात त्यांची भूमिका स्पष्ट होऊन स्त्रियांच्या हक्कांसाठी अधिक संशोधन आणि विचारव्यूह विकसित झाले.
4. फ्रेंच अँनल्स प्रणालीने इतिहासाच्या अभ्यासात कोणते बदल घडवले?
अँनल्स प्रणालीने इतिहासाचा अभ्यास केवळ राजकीय घटनांपुरता मर्यादित न ठेवता हवामान, शेती, व्यापार आणि स्थानिक लोकजीवन यांसारख्या घटकांचा विचार केला. यामुळे इतिहासाचा दृष्टीकोन विस्तारित होऊन तो सर्वसमावेशक आणि सामाजिक जीवनाशी संबंधित झाला.
5. लिओपॉल्ड व्हॉन रांके यांच्या मते, इतिहासलेखन कसे असावे?
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहासाला मूळ दस्तऐवजांच्या आधारे लिहिण्याचा आग्रह धरला आणि ऐतिहासिक घटनांचा विश्लेषण तटस्थतेने करण्यावर भर दिला. त्यांनी इतिहासात कल्पनेला थाराच नसावा आणि तो वस्तुनिष्ठ, पुराव्यांवर आधारित असावा, असे प्रतिपादन केले.
6. रेने देकार्त यांच्या मते इतिहास संशोधनाची पद्धत कशी असावी?
रेने देकार्त यांनी ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासणे आवश्यक आहे असे सांगितले आणि पुराव्यांशिवाय कोणत्याही घटनेचा स्वीकार करू नये, असे प्रतिपादन केले. त्यांनी “डिस्कोर्स ऑन द मेथड” या ग्रंथात शास्त्रशुद्ध विचारपद्धतीवर भर दिला आणि इतिहासाच्या अभ्यासात तार्किक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगितले.
Leave a Reply