भारत व अन्य देश
स्वाध्याय
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(1) भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश –
उत्तर: (क) नेपाळ
(2) भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश –
उत्तर: (अ) पाकिस्तान व चीन
(3) भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी –
उत्तर: (ड) वरील सर्व समस्या (जागतिक दृष्टिकोनातील फरक, काश्मीर समस्या, अण्वस्त्रविषयक संघर्ष)
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते कारणासह स्पष्ट करा.
(1) दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
उत्तर: बरोबर
कारण: भारत हा दक्षिण आशियामधील सर्वांत मोठा देश आहे. तो भौगोलिक, राजकीय, आर्थिक आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून, त्याचा शेजारी राष्ट्रांवर मोठा प्रभाव आहे.
(2) भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
उत्तर: चूक
कारण: भारत आणि चीन यांच्यात सीमावाद तसेच तिबेट प्रश्नावरून तणाव आहे. दोन्ही देश व्यापारी सहकार्य वाढवत असले तरी मैत्रीपूर्ण संबंध संपूर्णपणे प्रस्थापित झालेले नाहीत.
(3) श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली.
उत्तर: बरोबर
कारण: श्रीलंकेत तमिळ व श्रीलंकन सरकार यांच्यातील तणाव मिटवण्यासाठी भारताने शांतिसेना पाठवली होती, पण नंतर भारताने ती मागे घेतली.
3 . दिलेल्या सूचनप्रमाणे कृती करा.
१. पुढील तक्ता पूर्ण करा.
क्रमांक | झालेले करार/देणघेवाण | संबंधित देश |
---|---|---|
1 | शिमला करार | भारत-पाकिस्तान |
2 | मॅकमोहन रेषा | भारत-चीन |
3 | पाणीवाटप करार | भारत-बांगलादेश |
4 | नैसर्गिक वायूची आयात | भारत-म्यानमार |
5 | आण्विक सहकार्य करार | भारत-अमेरिका |
6 | पायाभूत क्षेत्रविकास, दहशतवाद, आरोग्य | भारत-युरोपियन राष्ट्रे |
7 | आर्थिक व तांत्रिक सहकार्य | भारत-आफ्रिका |
४. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(1) शिमला करार
शिमला करार १९७२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या करारानुसार, भारत-पाकिस्तान वाद द्विपक्षीय चर्चेने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला.
(2) भारत–नेपाळ मैत्री करार
हा करार १९५० मध्ये झाला. या करारानुसार, नेपाळ आणि भारतातील नागरिकांना परस्पर देशांमध्ये मुक्तपणे वावरण्याची आणि नोकरी व व्यापार करण्याची संधी मिळाली.
(3) मॅकमोहन रेषा
ही भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा आहे. चीनने ती मान्य केलेली नाही, त्यामुळे दोन्ही देशांत सीमावाद सुरू आहे.
(4) भारत–अफगाणिस्तान संबंध
भारत अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी मदत करतो. भारताने तेथे रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांत मोठे सहकार्य केले आहे.
५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(1) भारत-अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा.
उत्तर: भारत आणि अमेरिका दोन्ही लोकशाही देश असून त्यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य आहे. २००५ मध्ये संरक्षण करार आणि २००८ मध्ये आण्विक करार झाल्यामुळे संबंध आणखी दृढ झाले.
(2) शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही स्थापन होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणांसह माहिती लिहा.
उत्तर: भारताने नेपाळला लोकशाही स्वीकारण्यास मदत केली. बांगलादेश मुक्ती संग्रामात मदत केली. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही सरकार प्रस्थापित होण्यासाठी भारताने सहकार्य केले.
(3) दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC) कोणते कार्य करत आहे?
उत्तर: SAARC दक्षिण आशियाई देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर देते. दारिद्र्य निर्मूलन, व्यापार, शेती आणि शिक्षण या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
Leave a Reply